सांता भेटतो तेव्हा

  • 1.9k
  • 543

सांता भेटतो तेव्हातिच्या चिमुकल्या डोळ्यात नीज उतरली होती. खरं तर ती ख्रिस्ती परंपरेतली नव्हती पण अनेक देवांना पूज्य मानत असलेल्या तिच्या परंपरेबद्दल तिच्या वडिलांना आदर होता. त्यांनी तिला लहानपणीच ख्रिसमसचं खोटं झाड आणून दिलं.ते सजवायला चांदण्या!रंगीत काठ्या,घंटा,चेंडू असं खूप खूप काही. त्या चमचमत्या झाडाशेजारी तिने मोजा टांगून ठेवला होता. आणि चोवीस डिसेंबरच्या रात्री ती झोपली सांताची वाट पाहत. दरवर्षी सांता तिला हवं ते ठेऊन जात असे खाऊ खेळणी पुस्तकं पेन्सिली असं खूप खूप छान.सकाळी आईलासुद्धा माहिती नसे की हे सांता कधी ठेऊन गेला ते!पाहता पाहता वर्ष सरली. दरवर्षी न चुकता झाड सजवलं जाई. वस्तू आता ती आणू लागली सजावटीच्या.आता घरात