तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ८

(15)
  • 8.3k
  • 1
  • 3.3k

प्रसंग -६ स्थळ.. एखादं कॉफी शॉप अनु आणि केतन कॉफी पित बसलेले आहेत. अनु : केतन.. खरंच परत एकदा थॅन्क.. तु आलास म्हणुन.. नाही तर इतकी कामं होती.. एकट्याने फिरायला कंटाळा येतो.. आणि सुशांतला तर लग्न इतकी जवळ आलं आहे तरी कामातुन सवडच नाही. त्याचं ही बरोबर आहे म्हणा.. नेमका आजच व्हिसा इंटर्व्ह्यु आला त्याला तो काय करणार…??केतन : हे.. कम ऑन.. थॅक्स काय त्यात.. आणि त्या बदल्यात मी कॉफी घेतली ना तुझ्याकडुनअनु त्याच्याकडे बघुन हसते. केतन तिच्या हसण्याकडे पहातच रहातो. (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) एखादं केतन-अनुवर गाणे जे केतनचा भास असते. गाण संपता संपता स्टेजवर अंधार