तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १२

(41)
  • 9k
  • 5
  • 3.3k

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची… गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका कोपर्‍यात उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत.. अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण तिचं लक्ष सतत मान खाली घालुन उभ्या असलेल्या केतनकडे जाते आहे.आजुबाजुच्या लोकांच अनुचं आणि सुशांतच कौतुक करणं चालु आहे. आवाज १: ए सुशांत दा, मेहंदी बघ ना काय छान रंगली आहे अनु वहीनीची.. येना बघायला.. कित्ती छान दिसते आहे अनु वहीनीच्या हातावर..आवाज २: सुशांतदा.. मेहंदीमध्ये तुझं नाव लिहीलं आहे बरं का.. बघ शोधुन सापडते आहे का.. असलं भारी लिहीलं आहे ना..