भाग:१ लग्ना आधीचा प्रवास सुरुवात कुठून करू समजत नाही पण प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये एक अशी वेळ येते जिथे आपल्याला आपल्या कुटुंब पासून वेगळ केलं जातं.. काही जण स्वतःहून वेगळे होतात तर काही जणांची मजबूरी असते.. तर काही मनाच्या विरोधात जाऊन वेगळं राहतात.. एक मुलगी.. खर तर तिने जीवना मध्ये जन्म घेतल्या पासून आई वडिलांची इच्छा पूर्ण केलेली असते..लहान पण पासून त्या आई वडिलांनी अतोनात कष्ट करून आपल्या मुलीला मोठं केलेलं असत..आणि आता वेळ असते त्या मुलीला निरोप द्यायची , खर तर आपल्या पोटचा गोळा कोणा अनोळखी व्यक्तीला द्यायचा म्हणजे खूप मोठं काळीज लागतं.. तो बाप असतो.. जो मुलींच्या जन्मा पासून ते