स्वराज्यसूर्य शिवराय - 17

(11)
  • 5.2k
  • 1
  • 1.9k

पुरंदरच्या धुमश्चक्रीत किल्लेदार पडला. परमवीर कोसळला. मरण समोर दिसत असताना नाही खचला. मुरारबाजी शरण नाही गेला. प्रलोभनास नाही भुलला. शिवरायांचा जीवलग अमर झाला. स्वराज्याचा शिलेदार कामी आला. जाताना ताठ मानेने गेला. स्वराज्याचे शिर उंचावून गेला. भगव्याची शान राखत गेला. पुरंदरची शान गेली. अभिमान गेला. पुरंदरवरील मावळ्यांना अतीव दुःख झाले. प्रचंड धक्का बसला.पण त्या बहाद्दरांनी जिद्द सोडली नाही. धीर सोडला नाही.