अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 13

  • 4.8k
  • 2.4k

रात्रीची ९:१७ ची वेळ. पार्क रिकामे होते. बाबाराव पार्कच्या मध्यभागी घनदाट झाडीत कोणाची तरी वाट बघत थंडगार बाकावर बसले होते... थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आली. झाडी पार करून एक मंद प्रकाश झोत त्या व्यक्तीवर पडला. आलात तुम्ही विजय वाघ! बाबारावांनी वर पाहत तो मिस्टर वाघ असल्याची खात्री करून घेण्यासाठी विचारले. होय सर. मीच आहे! बोला ना काय काम होतं? मी तुमचं खूप नांव ऐकून आहे. सामाजिक कार्य करत असताना अनेकदा पोलिसांशी संबंध येतो. सगळ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याच नांवाची चर्चा