'उपहास बघ. एकेकाळचा इतका श्रीमंत माणूस आज त्यांच्यावर ही वेळ यावी?! बाबाराव देसाईंसारखा धाडसी, महान आणि समाजाला आदर्श असणारा व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त व्हावा ही गोष्ट जर समाजाला कळली असती, तर त्यांच्या प्रतिमेला तडा गेला असता. म्हणून मी माझे निर्दोषत्व सिद्ध करणारी ती चिठ्ठी नाहीशी केली. आणि म्हणूनच मला हा सारा प्रपंच रचावा लागला. हा एक एवढा मोठा खेळ...'एका व्यक्तीचा स्वाभिमान टिकवण्यासाठी याने संपूर्ण देश ढवळून काढला होता...'बाबारावांच्या नातेवाईकांचा इतका मोठा काय गुन्हा होता, की मी या सगळ्यांना मारले असे तुला वाटते होय ना? 'एका म्हाताऱ्याला सांभाळणे या लोकांना इतके जड झाले होते, की त्या म्हाताऱ्याला मरणाची इच्छा व्हावी?'हे असे लोक जगत