थोडं मनातलं

  • 2.8k
  • 1
  • 676

 "आजपासुन मी तुला स्वातंत्र्य बहाल करतोय,स्वातंत्र्य विचारांचं .चांगलं,वाईट तु ठरवायचंस.विविध प्रवृत्तींमधे तुला एकटं सोडतोय.तुला कुणासोबत रहायचंय हे तु ठरव.कारण तु स्वतंत्र आहेस.फक्त एक लक्षात ठेव! ह्या स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देऊ नकोस ,कारण अतिरेक झाला की माणुस स्वैराचारी होतो.आणि जर स्वैराचारी झालास तर संपुन जाशील."    प्रिन्सिपल उमाळेंच्या कक्षातुन बाहेर आल्यानंतर बाबा बोलत होते .काँलेजच्या गेटच्या कोपऱ्यात एक पोस्ट ऑफिस होतं,बाबांनी काही पोस्ट कार्डस् आणि अंतर्देशीय पत्रांचा गठ्ठा माझ्या हाती दिला.म्हणाले"काही अडचण आली तर लिहायचं."    त्यांनी रिक्षा थांबवली ,चल!येतो रे म्हणाले.बाबांच्या करड्या आवाजाला असलेली कातर स्वराची धार मात्र प्रकर्षाने जाणवली.माझ्याकडे न बघताच ते रिक्षात बसुन निघुन गेले.शिवाजी बहुउद्देशीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या