सावर रे मना

  • 9.4k
  • 1.8k

बेबी ब्लुज् आणि पोस्टपार्टम डिप्रेशन(प्रसुतीनंतरचे औदासिन्य) मला अर्चनाची आई एका जवळच्या लग्नात योगायोगानं भेटली.मी काहीशा उत्सुकतेनं आणि काळजीनं विचारलं, आता कशी आहे अर्चना? 'गोळ्या सुरू हायेत पन् आता तशी बरीये त्या म्हणाल्या. अर्चनाचा चेहरा दिवसभर डोळ्यापुढून जात नव्हता.एका छानशा ,खळाळत्या व्यक्तिमत्त्वाला ग्रहण लागल्यासारखं झालं होतं.मला तिची सगळी हिस्ट्री दिवसभर आठवत राहिली. अर्चनाची केस म्हणजे टिपिकल 'पोस्टपार्टम सायकोसीस'ची. .बेबी ब्लुज् आणि पोस्टपार्टम डिप्रेशन व पोस्टपार्टम सायकोसीस ह्यात थोडासा फरक आहे.बेबी ब्लुज् म्हणजे फक्त चिडचिड, विनाकारण मूड जाणे,झोप न येणे वगैरे जे बऱ्याच वेळा आपोआप नियंत्रणात येतात .मात्र जर ह्यात आत्महत्येचे विचार किंवा बाळाला इजा करण्याचे विचार आले की,ते पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे डॉक्टर्स समजून