स्वराज्यसूर्य शिवराय - 21

  • 4.8k
  • 3
  • 1.8k

महाराष्ट्र ही संतांची भूमी! अनेक संतश्रेष्ठ या भूमीत होऊन गेले. त्यांनी धार्मिक जागृती तर केलीच परंतु सोबत राजकीय आणि देशप्रेम या संदर्भात जाणीव जागृतीचे महान काम केले. त्यासाठी कीर्तन, अभंग, दोहे, भजन, गवळणी, भारूड, प्रवचन अशा विविध प्रभावी माध्यमातून जनजागरणाचे फार मोठे कार्य संतांनी केले. शिवरायांच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना शिवजन्मापूर्वीही अनेक संत या राज्यात होऊन गेले. त्यापैकी चक्रधर स्वामी, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ह्या प्रमुख संतांचा उल्लेख आढळतो. शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रात फार मोठे जनशिकवणीचे कार्य करीत होते.