#मिटू ( भाग -11)

  • 4.8k
  • 2.3k

जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो . आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो . प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?आणि तस चुकून माकून झालंच तर समाजात