आश्रय

  • 21.7k
  • 8k

आश्रय स्वरूप आणि मधुरा नेहमी प्रमाणे जॉगिंगला चालले होते. सकाळी ७ - ७.१५ ची वेळ असेल. जॉगिंग पार्कमधे गेले आणि जॉगिंग सुरू केले. सगळे आपाल्या नादात होते. स्वरूप आणि मधुराही. मधुराने ट्रॅकचा एक राउंड पूर्ण केला आणि दुसर्‍या राउंड साठी वळली तोच तिची नजर ट्रॅकच्या मधोमध लॉनवर बसलेल्या लहान मुलीवर गेली. ती लहान मुलगी तिथे मधोमध रडत बसली होती. अगदी दोन-तीन वर्षाची असेल. सगळे आपापल्या गडबडीत असल्यामुळे ऐकूनही न ऐकल्या सारखे करत होते. मधुरा मात्र वळणावरच थबकली. त्या मुलीकडे गेली. ती आई आई करून रडत होती.तिची अवस्था अगदी पाहवत नव्हती. अंगात मळकटलेला..जागो जागी फाटलेला फ्रॉक..विस्कटलेले केस.. चेहरा धुळीच्या लोटाने काळवंडलेला..अगदी