स्वराज्यसूर्य शिवराय - 22

(14)
  • 5.6k
  • 2
  • 2.3k

बहलोलखान आदिलशाहीतील एक हुकमी एक्का! एक प्रभावी अस्त्र ! अतिशय नीडर, बेडर, खुनशी अशी ख्याती असलेला एक सरदार. शिवरायांकडून, त्यांच्या मावळ्यांकडून अनेकवेळा आदिलशाहीतील बड्याबड्या सरदारांनी जबरदस्त पराभवाची चव चाखली होती. अनेक मानहानीकारक पराभव आदिलशाहीच्या खात्यावर जमा झाले होते. शिवरायांचा पराभव कसा करावा हा फार मोठा प्रश्न आदिलशाहीसमोर पडलेला असताना त्यावर विचारमंथन चालू असताना, प्रत्येक पराभवाची शहानिशा चालू असताना 'शिवरायांच्या वाघांनी पन्हाळा जिंकला' ही अजून एक चिंतेत टाकणारी, लाजीरवाणी बातमी विजापूरावर तोफेच्या गोळ्याप्रमाणे येऊन धडकली.