इश्क – (भाग ८)

(19)
  • 9.1k
  • 1
  • 4k

कबिर तिथे किती वेळ बसला होता? त्यालाच माहीत नाही. कदाचीत दोन मिनीटं असेल, कदाचीत दोन तासही असेल. प्रश्न तो नव्हताच, प्रश्न होता राधा निघुन गेली पुढे काय? काही क्षण ओसरल्यावर कबिर भानावर आला. त्याच्यात लपलेला गुन्हेगारी-कथा-लेखक जागा झाला. राधाने काही तरी ‘क्ल्यु’ सोडला असेलच की. काही तरी, ज्यावरुन राधा कुठे गेली ह्याचा पत्ता लागेल. कित्तेक सराईत गुन्हेगार सुध्दा गुन्हा करताना नकळत काहीतरी खूण सोडून जातातच… कबिर नव्या उमेदीने उठला आणि त्याने राधाची खोली शोधायला सुरुवात केली. कपाटं, टेबलाचे ड्राव्हर्स, बेडखाली, डस्टबीन जेथे शोधता येईल तेथे.. पण कागदाचा एक साधा कपटा सुध्दा सापडला नाही. कबिर स्वतःशीच चरफडत होता… ‘थिंक कबिर.. थिंक…’त्याने