स्वराज्यसूर्य शिवराय - 23

(13)
  • 5.1k
  • 1
  • 2.3k

शिवरायांची घोडदौड अविरत चालू होती. सर्वत्र त्यांचा दरारा पसरत होता. विशेषतः शत्रूपक्षांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाची धास्ती पसरली होती. कारण शिवरायांनी कामगिरीच तशी जबरदस्त केली होती. शत्रूंनी शेकडो वर्षे मराठी भागातील जनतेला स्वतःच्या अंमलाखाली ठेवून अतोनात, क्रुर, भयंकर असा छळ केला होता. प्रचंड प्रमाणात लुट केली होती. त्यांच्या क्रुरकर्माला कुणी फारसा विरोध करत नसे. अधूनमधून कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला संपवण्यासाठी ही दुश्मन मंडळी मागेपुढे पाहात नसत.