इश्क – (भाग १०)

(15)
  • 11k
  • 1
  • 4k

ज्या दिवशी राधा कबिरला सोडुन निघुन गेली होती त्या रात्रीपुर्वीच्या गप्पांच्या सेक्शनचे पान कबिरने लॅपटॉपवर उघडले. ह्यातील प्रसंगात अजुन काही भर घालण्याच्या हेतुने कबिरने लिहायला सुरुवात केली.. “हे बघ राधा.. ठिक आहे.. यु आर नॉट हॅपी विथ युअर हजबंड.. पण नॉट हॅपी विथ लाईफ़..?? मला नाही पटत… तुझं आयुष्य मे बी अनेकींसाठी एक ड्रिम लाईफ़ असेल.. गडगंज नवरा.. हाताशी भरपुर पैसा.. फिरायला २४ तास गाडी, पार्टी लाईफ़, सेलेब्रेटी स्टेट्स.. आय मीन व्हॉट्स रॉग?” “असेल.. इतरांसाठी असेल.. माझ्यासाठी नाही..”, राधा“पण का? ““कारण मला माझं स्वातंत्र्य महत्वाचं आहे कबिर… मला लग्नानंतर माझं पुर्ण आयुष्य असं डोळ्यासमोर दिसत होतं. मुलं-बाळं त्यांच खाणं-पिणं.. मग