मात भाग २

  • 30.1k
  • 1
  • 22.3k

रेवती तशीच विचार करत करत बेड वर पडून होती. संध्याकाळ झाली होती.तिने सकाळ पासून काहीही खाल्लेले नव्हते. जुई केव्हाची तिला उठून काही तरी खाऊन घे म्हणून सांगत होती.चल जरा चक्कर मारुन येऊ म्हणजे तुला बरे वाटेल म्हणाली. पण रेवतीला कसालाच उत्साह नव्हता. ती पडल्या पडल्या फक्त एकटक मोबाईल कडे बघत होती. जुईने तिला थोडे हलवल्यावर ती कशीबशी बेडवर उठून बसली. दोन्ही हात लांबवून एक मोठा आळस दिला..घड्याळावर एक नजर टाकली..तिने चेहऱ्यावर पाण्याचे ३-४ सपकारे मारले.. तेवढ्यात तिचा फोन वाजला..सुहास शुद्धीवर आला होता.. रेवतीला फार बरे वाटले.. त्याचे आई-बाबा पण आले आहेत हे ऐकून रेवतीची काळजी बऱ्यापैकी कमी झाली. तिला सुहासला