हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 4)

  • 6.2k
  • 1
  • 2.7k

शेवटी जातीने प्रेमाचा घात केला .सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .मंद संचारलेला गारवा पहाटेच्या वातावरणात हसमुख झालेला उत्साही चेहरा नव्या जोमाने कामाला लागला पहाटेचे पाच वाजले होते मश्जीद मध्ये नमाजचे प्रयोजन सुरू होते .अवतीभोवती अल्लाहा हो अकबर ह्या ध्वनीने कानात आवाज गुंजत होता .त्या आवाजाने तायराला जाग आली .नेहमी प्रमाणे ती उठली .तेजस्वी गौरवर्ण चेहरा गुलाबाच्या पाकळ्या सारखे तिचे ओठ ..डोळे मिटलेले दोन्ही हात त्या सुंदर चेहर्यासमोर अल्लाहाचे स्मरण