सातारा येथे असताना शिवराय आजारी पडले. अफवांचे पिक जोमात आले. कदाचित त्या अफवांमुळे नको ते घडले, ठिणगीची बीजे पेरल्या गेली. संभाजी राजे! शिवरायांचे चिरंजीव! संभाजी लहान असतानाच दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईविना असलेले तान्हे पोर आजीच्या कुशीत शिरले. माँसाहेब त्या तान्हुल्याच्या आई बनल्या. मातेची उब देऊन त्यांनी संभाजीराजांना खेळवले,भरवले, खाऊ घातले, झोपवले. शिवरायांच्या पत्नी म्हणून आलेल्या इतर माता संभाजीराजांना होत्या पण त्या सावत्र आई होत्या. कुणी तसा भेदभाव करीत नसल्या तरीही सोयराबाईंची संभाजीसोबतची वागणूक तितकी आपलेपणाची नव्हती. त्यांना पुत्र झाला.