इश्क – (भाग १३)

(21)
  • 8.6k
  • 2
  • 3.8k

राधाचा फोन येऊन गेल्यावर अनुरागने चक्र वेगाने फिरवली. राधाच्या जामीनीची पुर्तता त्याने काही फोन-कॉल्सवरच करुन टाकली आणि तो स्वतःचे हेलिकॉप्टर घेउनच गोकर्णला गेला. गोकर्णचे एक बिझीनेसमन त्याच्या ओळखीचे होते,त्यांच्या फार्म-हाउसवरच्या हेलीपॅडवर उतरुन त्यांच्याच कारने तो पोलिस-स्टेशनला पोहोचला. पोलिस-स्टेशनवर जणु जगातले सगळे पत्रकार, सगळे टीव्ही चॅनल्स आपापल्या ओबी-व्हॅन्ससहीत जमले होते. अनुरागने आधीच फोनवरुन तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे त्याची कार पोलिस-स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि त्याला सुरक्षीत आत घेऊन गेले. अनुरागकडुन बाईट्स मिळवण्यासाठी सगळ्यांची चढाओढ चालली होती, पण पोलिसांपुढे कुणाचाच निभाव लागत नव्हता.. “आता कळेल साल्याला मिडीया मागे लागली की काय होते ते…” पोलिस-स्टेशनच्या पायर्‍या चढताना कुणाचेतरी वाक्य अनुरागला