मात भाग ३

  • 29.6k
  • 1
  • 20.3k

रेवतीला सुहासच्या वागण्यातील बदल जाणवू लागले होते पण कारण तिच्या लक्षात येत नव्हते.. आपले काही चुकले का? आपण अनावधानाने सुहासला कधी दुखावले का? काही काही कळण्यास मार्ग नव्हता.. या घडीला तरी तिला हे सगळेच तिच्या आकलना पलिकडचे वाटत होते.. पण हे मुरणारे पाणी कोणत्या प्रवाहाला जाऊन मिळत आहे.. प्रवाहाचा वेग मंदावला आहे की प्रवाहाने त्याची दिशाच बदलली आहे याचा छडा लावायचा चंगच रेवतीने बांधला होता..ती फार अस्वस्थ झाली होती की काहीतरी असे आहे जे सुहास आपल्या पासून लपवत आहे आणि ज्यामुळे तो आपल्याला टाळत आहे..एवढ्या सुंदर कणाकणाने बहरलेल्या नात्याची रेशमी वीण एवढ्यात उसवायला सुरुवात तर झाली नसेल ना! अचानक रेवतीच्या मनात विचार