हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 7)

  • 4.3k
  • 2k

आम्ही तिघांनी अर्धी रात्र त्या किनारपट्टीवरच घालवली . मी मॉमच्या खांद्यावर डोकं ठेऊन बसलेली होती माझ्या बाजूला जॉन ..तो खोड्या करतं होता त्या बालपणीच्या खोड्या आमच्या आज पूर्ण होत होत्या आणि मी मॉमला सांगत होती मॉम बघ ना ब्रदरला . गिटो काहीच न बोलता हसतं होता आमच्याकडे बघून . जवळ जवळ मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही किनारपट्टीवरून घरी परतलो ते पाऊस आल्यामुळे . मला पावसात भिजायचं होतं आणि जॉन म्हणतं होता , " आता कुठे पाऊस पडायला सुरवात झाली अन घामाच्या धारा ओघळून निघू लागल्या ये तू चल हा लवकर इथून लुसिआ पावसात भिजायचं नाही अजिबात ... " मी त्याच्याकडे बघतं मॉमला