आयुष्याचे पान

  • 10.2k
  • 1
  • 2.3k

आयुष्याचं पान ! एखादी नवीन वही खरेदी केल्यावर आपण किती उत्सुक असतो नाही त्यावर लिहिण्यासाठी. नव्या वहीचा नवा कोरा वास ही आवडतो आपल्याला. त्या वहीचे कव्हर किती आकर्षक आहे किंवा नाही यावरून बरेच जण ती वही वापरायची कि नाही ठरवतात. आवडतं कव्हर आवडत्या विषयाला. नावडते कव्हर नावडत्या विषयाला. पण खरी गम्मत असते ती वहीच्या आत. वहीच्या पानांमध्ये. कारण वरून जरी प्रत्येक पान सारखं दिसत असलं तरी प्रत्येक पानं हे वेगळं असतं. एखाद्या पानावर रेषा स्पष्ट उमटलेल्या नसतात. काही पानं कोरीच सुटलेली असतात. काही पानावरील रेषा अर्धवट सरळ आणि अर्धवट नागमोड्या असतात . तर काही रेषांची सुरुवात जरी व्यवस्थित सरळ झाली असली