मात भाग ४

  • 29k
  • 17.4k

मोबाईलच्या अलार्मने रेवतीची झोप मोडली.. तो बंद करून ती एका कुशीवर झाली.. कालचा अस्वस्थपणा बहुधा तिच्या उठण्याची वाट पाहत.. उशाशीच ठाण मांडून बसला असावा.. ती जागी होताच काही सेकंदातच कालचा तो अस्वस्थपणा रेवतीला परत जाणवू लागला.. ती बेडवर उठून बसली.. डोके जड वाटत होते तिला.. दोन्ही हातांनी केसांना मागे घेऊन क्लच लावले.. नंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासले.. त्या निर्माण झालेल्या ऊर्जेचा शेक डोळ्यांना आणि चेहऱ्याला देत तिने आपल्या नवीन दिवसाची सुरुवात केली..खिडकीचे पडदे बाजूला करून सूर्याच्या कोवळ्या किरणांना खोलीत प्रवेश करण्यास तिने वाट मोकळी करून दिली.. खिडकीची काच उघडली तसा सकाळचा प्रदूषणविरहित मंद वारा खिडकीच्या पडद्यांशी खेळू