कबिर आणि राधा साधारण ३-३.३० तास ड्राईव्ह मध्ये एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत.शेवटी बर्याचवेळानंतर राधा म्हणाली, “आय एम सॉरी!”“सॉरी? सॉरी कशाबद्दल? बिचबद्दल…. की त्या घाटाबद्दल?”, कुत्सीतपणे कबिर म्हणाला“दोन्हीबद्दल…”, राधा “म्हणजे? तुला म्हणायचंय की दोन्ही बाबतीत चुकलीस?”“नाही.. मी चुकीची नक्कीच नाही वागले.. पण तु हर्ट झालास.. म्हणुन सॉरी..”“ओह.. सो तुला वाटत नाहीए तु चुकलीएस.. मग तुला काय करायचंय कोण हर्ट झालं आणि कोण नाही. तु बरोबर आहेस ना.. मग झालं तर…” “नाही, तसं नाही. सगळ्यांत पहीलं म्हणजे मी माझ्या भावनांना आवरायला पाहीजे होतं.. निदान तुझ्या बाबतीत. मी प्रेझेंट मधे जगणारी मुलगी आहे कबिर.. त्या क्षणी जे वाटलं ते करते. आधी काय