वातावरणात संचारलेला गारवाच एवढा तीव्र होता की तिला आज अंथरुणाच्या बाहेर पडावं वाटतं नव्हतं ... दिनू ला कॉल करू का ? नाही नको शाळा सुटायची असेल त्याची . वर्गावर असणार तो तर उगाच खोळंबा होईल त्याला आपल्यामुळे म्हणून ती डायरी आणि पेन घेऊन काहीतरी मनातला साचलेला गाळ कोऱ्या पानावर उतरवत होती .....दिनू हा काव्याचा खूप जवळचा मित्र जवळचा म्हणण्यापेक्षा अगदी हृदयालगतचा तिच्या जीवनात काहीही बरं वाईट घडलं तर त्याची पहिली न चुकता खबर जायची दिनूला .काव्याची आणि दिनूची मैत्री म्हणजे अल्लड अवघड आणि खट्याळ बॉंडिंग .....कवितेत प्रथम क्रमांक आलेल्या लिस्ट मध्ये सर्वात उंचावर त्याचंच नाव होतं . सर्टिफिकेटला फोटो पाहिजे आहे तुमचा म्हणहून हिने त्याला इंफॉर्म