इश्क – (भाग १८)

(15)
  • 6.2k
  • 3
  • 2.4k

“मग.. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?”, कडक कॉफीचा घोट घेता घेता मेहतांनी कबिरला विचारलं.“कश्याबद्दल?”, कबिरने न कळुन विचारलं“कश्याबद्दल काय.. तु पुस्तकाचा दुसरा भाग लिहीणार आहेस ना.. त्याबद्दल.. काही विचार केला आहेस का?”“ओह.. हा.. ते… नाही.. अजुन काही विचार नाही केलाय…”“मग कर की सुरु आता.. आत्ता विचार चालु केलास तर ४-६ महीन्यात थोडीफार सुरुवात होईल…” “हम्म.. बरं, आपल्या सगळ्या एडीशन्स संपल्या का?”“अरे हा.. बरं झालं आठवण केलीस.. आपण तिसरी एडिशन जरा जास्तीच मोठ्ठी काढली होती.. पण थोडा आता सेल कमी झालाय.. पुस्तकही दुकानात पडुन आहेत.. तर आमच्या मार्केटींग टीमने एक नविन कल्पना काढली आहे.. विक्री वाढवण्यासाठी…” “काय?”“तु ते पुस्तकाच्या शेवटी तुझा