काळोख दाटलेला होता सर्व दूर किर्रर्र अंधाराचा विळखा . रातकिडयांचा गोघावणारा आवाज व्हावा एवढंच बाकी सारं अंधारात विलीन . त्या भयाण शांततेत त्याला हिंस्त्र पशुची भीती नव्हती तो एक महान योद्धा रणभूमीवर लाखो शत्रूसैनिकांचा पराभव करणारा युद्धाच्या वेळी तलवार हातात घेऊन विजयाने धुंद धावणारा तो ह्या जंगली प्राण्यांना कसा घाबरणार . रात्रीच्या नीरव शांततेत तो गाढ झोपी गेला होता . झोपेत असताना एक पुसटशी आकृती अभिमन्युच्या डोळ्या समोर आली ." अभिमन्यु ...."तो कर्कश घरगरणारा घसा सुकलेल्या गळ्यातून निघणारा आवाज ऐकून अभिमन्यु शहारला जणु तो आवाज अभिमन्युच्या खूप जवळच्या व्यक्तीचा होता तो चाचपडतं उतरला ," गुरु गुरु तुम्ही , तुम्ही कुठे