इश्क – (भाग १९)

(16)
  • 6.6k
  • 3
  • 3.1k

मेहतांनी ‘ड्रॉ’ ची तारीख एक महीन्यांनी ठेवली होती. तो महीना कबिरसाठी अंत पहाणारा ठरत होता. कबिर अक्षरशः एक एक दिवस मोजुन काढत होता. रतीबद्दल.. तिला भेटण्याबद्दल त्याला उत्सुकता का वाटत होती हे त्यालाच कळत नव्हते, परंतु बर्‍याचदा असं होतं ना की काही व्यक्ती एका भेटीतच ओळखीच्या वाटतात तर काही अनेक भेटींनंतरही अनोळखी. राधाच्याबाबतीत कबीरची ही भावना खुप जास्ती स्ट्रॉंग होती, पण कदाचीत तेंव्हा तो तिला प्रत्यक्षात भेटला होता. रतीशी तर तो फक्त फोनवरच बोलला होता. त्या दिवसानंतर रतीला पुन्हा फोन करण्याचा त्याला अनेकवार मोह झाला. परंतु त्याचे दुसरे मन त्याला साथ देईना. शेवटी काहीही झालं तरी ह्या घडीला तो एक