ग्रामीण शब्दावली

  • 10.6k
  • 1
  • 2.7k

ग्रामीण शब्दावली कुसुमाग्रजांच्या या ओळीतून मराठी भाषेविषयीचा स्वाभिमान जागा होतो. आपण जन्माला आल्यापासून आपली भाषा आपल्या कानावर पडत राहते, आणि आपसूकच त्या भाषेशी आपली नाळ जोडली जाते.. आईसारखाच एक जिव्हाळा आपल्या बोलीभाषेविषयीसुद्धा वाटतो.. मग जसजसा आपला विकास घडत जातो तसतशी अनेक भाषांशी आपली ओळख होत राहते.. मग ती व्यावहारिक भाषा असो वा शैक्षणिक भाषा असो.. वेगवेगळ्या भाषा अवगत करताना कुठेतरी आपली भाषा हरवत चालली आहे याचे विस्मरणच होते.. पण तरीही आपली माती, आपली माणसे आणि आपली मातृभाषा, बोलीभाषा यांच्याशी अजूनही आपली नाळ जोडली गेली आहे.आणि ती अधिक घट्ट होण्यासाठी , भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा एक छोटाशा प्रयत्न...