इश्क – (भाग २३)

(11)
  • 7.1k
  • 3.4k

नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी जाणार्‍या रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन राधा पुनमबरोबर ग्रिल्ड सॅंन्डविच आणि कॉफी घेत होती. बरोबरची ट्रिप आदल्या रात्रीच परतली होती आणि ती आणि पुनम, अवंतीकाने सांगीतल्याप्रमाणे महीना दोन महीने तेथे थांबुन रेकी करणार होत्या. “राधा.. तो शेफ़ बघ नं.. कसला हॉट आहे ना?”, पुनम आतल्या काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाली..“हो ना अगं.. नाही तर आपल्या इथले.. दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर…”“तो बघतोय मगाच पासुन तुझ्याकडे…”, राधाला चिडवत पुनम