आस (१)

  • 3.3k
  • 1
  • 1.1k

सकाळचे १०.०० वाजले आणि मोबाईलचा गजर जोर जोराने वाजुन लागला . विशाल झोपेतून जागे झाला व तसाच अंथरनात पडुन  राहिला  त्याचे आजही स्वप्न अपुरे राहिले होते त्यामुळे  तो तसाच अंथरनात पडुन जे   स्वप्न पडलेले होते ते, तो  आठवत होता.  तो स्वतः त्याच्या मनात पुटपुटला , किती सुंदर स्वप्न होते ते  ,  ति मला भेटण्यासाठी  बागेत येणार होती .मी मात्र अगोदरच बागेमध्ये येऊन एका बाकावर बसलो होतो. सुंदर असा बगीचा पुर्ण फुलांनी बहरलेला व रंगेबीरंगी  फुलपाखरे त्या फुलांचा  स्वाद घेत मग्न होऊन त्या फुलांनवर बसलेली .  आणी  ते हिरवेगार गवत.  मंद हवेच्या झुळूकानी त्या गवतांची पाते डुलत  असताना , असे वाटत होते