रेवती सध्या वेगळ्याच मनस्थितीत होती.. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता..तिला कळत होते की तिचे प्रतीकशी बोलणे झाल्याशिवाय.. या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाल्याशिवाय तिला काही चैन पडणार नाही..रेवतीने बराच विचार करून.. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवून.. आणि हिंमत एकवटून.. मनाशी काहीतरी निश्चित केले.."रेवती, जरा शांतपणे बोल.. घाई करू नकोस.. प्रकरण तुला वाटले होते त्यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.." ती स्वतःशीच संवाद साधत होती..घडलेल्या प्रसंगांची साधारण मनाशी उजळणी करत करतच तिने प्रतीकला फोन लावला.."काय म्हणतोयस? कसा आहेस?.. मला तुला जरा तातडीने भेटायचे आहे"स्वतःला शांत राहण्यास बजावूनही.. एकंदरीत सगळ्या घटनाक्रमामुळे तिला स्वतःच्या वागण्यावर ताबा ठेवता आलेला नव्हता..रेवती