स्पर्श.

  • 6.9k
  • 2
  • 2k

रोहन. एका कंपनी मध्ये चांगल्या पदावर काम करत असेलला तरुण. कंपनीनेच दिलेल्या फ्लॅट मध्ये आणखी तीन मित्रांसोबत राहायचा. इतर लोकांच असत तसच साधारण आयुष्य तो जगत होता. सोमवार ते शनिवार तेच रुटीन. सकाळी उठायचं, लगबगीने आवरून निघायचं. कंपनी ची बस पकडायची. तिथे जाऊन फेसबुक बघायचं, व्हाट्सएपच्या दुनियेची स्वारी करायची. रोजचा टास्क पूर्ण करायचा, दुपारी जेवण आणि पाच वाजताची वाट... घरी यायचं .घरी आल्यानंतर ची वेळ मात्र रोहन आणि त्यांच्या मित्रांसाठी निवांत वेळ असायची. मोबाईल मध्ये असलेले सगळे सोशिअल मीडिया तो चाळायचा. एकाच घरात राहत असलेल्या त्या चौघांमध्ये जरी जास्त बोलणं होत नसलं तरी , फेसबुकवर त्यांचे हजारो लाखो मित्र मैत्रिणी होत्या,