इश्क – (भाग २८)

(59)
  • 9.1k
  • 5
  • 3.4k

कबीरच्या मनाची स्थिती सांगता येण्यापलीकडची झाली होती. एका बाजुला राधाला गमावल्याचं दुःखं होतं तर दुसरीकडे उर्वरीत पूर्ण आयुष्यभर लाभणार्‍या रतीच्या साथीचं सूख. कबीरला हा क्षण अजरामर करायचा होता. त्याच्या ह्या विचीत्र वागण्याचा जितका त्रास त्याला झाला होता तितकाच नक्कीच रतीला ही झालेला होता ते तो जाणून होता. पण कसं?काय करावं? त्याला काहीच सुचत नव्हतं. तो डोळे मिटून स्टेअरींगवर डोकं ठेवुन बसला होता इतक्यात खिडकीच्या काचेवर टकटक झाली म्हणुन त्याने दचकून डोळे उघडुन बघीतले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. समोर राधा उभी होती. “राधा.. तु??”, दार उघडून बाहेर येत कबीर म्हणाला..“हो.. मी आले परत…”“परत???? म्हणजे???”, कबीर संभ्रमात पडत म्हणाला..“घाबरु नकोस.. परत