पाठलाग – (भाग-१)

(46)
  • 25.5k
  • 6
  • 17.9k

जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर आला. रस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या