पाठलाग – (भाग-२)

(28)
  • 12.7k
  • 2
  • 8.8k

“ऑर्डर ऑर्डर…!!” न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली. न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी केली होती. “पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले. आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.———————————————————————————————— “जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता. पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट