पाठलाग – (भाग-३)

(37)
  • 12.3k
  • 2
  • 8.7k

दिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा वेध घेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या. दिपक कानोसा घेत पडुन राहीला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या. त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी