पाठलाग – (भाग- ४)

(25)
  • 13.5k
  • 2
  • 6.6k

दिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.काय आहे ६ दिवसांनी? कोण आहे तो कैदी? तो आपल्याला का मदत करत आहे? ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना? कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल? कश्यावरून मला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील? चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का? अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता