पाठलाग – (भाग- ५)

(22)
  • 9.9k
  • 2
  • 5k

“ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..” “अरे पण का? कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का आपण कोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाहेर राहीलो तर तुमची सुटका करु शकेन. आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे. तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन..