स्त्री शिक्षणाचे शिल्पकार : महर्षी कर्वे !

  • 14.9k
  • 4k

'महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होते......' (प्रल्हाद केशव अत्रे) मुरुड हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव. या गावात केशवपंत कर्वे या नावाचे सद्गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते. लक्ष्मीबाईंचे माहेर शेरवली हे गाव. कर्वे कुटुंब तसे गरीब होते. दोघांचाही स्वभाव स्वाभिमानी होता.