दिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. बसायची आसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते. दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल