दुसर्या दिवसाची सकाळ प्रसन्न होती. दिपक अगदी गाढ झोपला होता, जणु कित्तेक दिवसांची झोप तो पुर्ण करत होता. खिडकीतुन उबदार सुर्याची किरण अंगावर आली आणि खार्या वार्याचा एक झोक नाकात शिरला तसा दिपक जागा झाला. त्याला पहील्यासारखेच फ्रेश वाटत होते. तो खोलीचे दार उघडुन बाहेर आला. हॉटेलमधील वेटर्सची नेहमीप्रमाणे लगबग चालु होती. केसांवरुन हात फिरवत तो व्हरांड्यात आला तोच थॉमसही तेथे आला. उघडाबंब आणि लाल रंगाची बर्म्युडा घातलेला थॉमस अजुनच अवाढव्य भासत होता. “गुड मॉर्नींग दिपक, कशी झाली झोप?”, त्याने दिपकला विचारले.“मस्त.. खुप मस्त. हवेत गारठा असुनही समुद्राच्या दमटपणामुळे मस्त उबदार वाटत होते. खुपच वेळ झोपलो खरं तर..”, खजील होत