थॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते. थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता बोलता थोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता. रात्री थॉमस आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता. गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली. अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही