“काय??? थॉमसचा खुन???.. मी कश्याला करु थॉमसचा खुन??”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला?..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती. “चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती त्याला म्हणाली. दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला. स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला. थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता. भुत बघीतल्यासारखा दिपक त्या