विचार करत होते फिरायला जाण्याचा आणि डोक्यात भलतेच येत होते.आज काहीच करावेसे वाटत नव्हते.मन थाऱ्यावर नव्हते.सारखे अस्वस्थ वाटत होते.काय करू सुचत नव्हते.सहजच पायाचा ओला ठसा बघितला आणि ठरवलं जुहू ला गाठण्याच.सगळं कसं अनप्लांड आणि आपसूक घडत होते.वेळ काट्याप्रमाणे थांबायचं नाव घेत नव्हता.घोड्यावर बेभान झाल्यासारखा तो त्याच्या वेगाने निसटत चालला होता.आणि मी इथे माझ्या तयारीला लागले. तयार होण्यात माझ्या इतका चपळ हातखंडा कोणाचा नसेल बहुधा.तयार होऊन लागले वाट्याला.अंतर कसं कापलं गेलं कळलंच नाही विचारांच्या नशेत मी इतकी धुंद झालेली.समुद्राचा खारा वारा जणू मला खुणावत होता त्याच्याकडे. एकदाचे पोहोचले तिथे.पोहोचल्यावर इतकं शांत वाटलं.मनाची खोली मोजायची असेल तर आपण जवळीक