फुल्यांची सावित्रीबाई

  • 9k
  • 3k

'सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार-मांग नीच म्हणून स्पृश्य-अस्पृश्यता मानणे मूर्खपणाचे आहे. जे लोक असे मानतात व तिचे देव्हारे माजवितात. त्यांना ईश्वराचे सत्यस्वरुप कधीच ओळखता येणार नाही.