विहार  

  • 7.7k
  • 1
  • 2k

विहार महाकाय पिंपळ बोधीवृक्षाखाली बाबा त्रिशरण जपायचे. अगदी भल्या पहाटेलाच मी सायकलवरून तालुक्याला दहा किमीचा प्रवास करीत कॉलेजात जायचा. माझ्या शिक्षणातील हा नित्यक्रम होता आणि सांजेला पुनश्च गावात परत येणं व्हायचं. माध्यमिक शिक्षणापासून आता पदव्युत्तर शिक्षणापर्यंत नियमीत खडतर प्रवास, नित्य अभ्यास आणि त्या करिता अथक परिश्रम मी घेतलेत. गावाच्या वायव्येकडून जाणारी ही निमा नदी, तीला लागून असलेली ही टेकडी, दगड धोंड्याची पायवाट वजा रस्ता तुडवणं अगत्याचं होतं. आमचं गाव अगदी छोटसं खेडं. पाचपन्नास झोपडीवजा घरं. प्रत्येकांना चार-दोन एकर शेती, शेतमजुरी आणि त्यावरच गुजरान व्हायची. गावात असं शिकलं सवरलं कुणीच नाही. मॅट्रिक झालेली चार-दोन पोरं होती एवढीच.