पाठलाग – (भाग-१७)

(22)
  • 8.2k
  • 1
  • 4.6k

मोहिते निघून गेला, पण जाताना तो जे बोलला ते दोघांच्या डोक्यात घर करून गेले. मोहिते म्हणाला होता, “डोंट ट्राय टू ओव्हरस्मार्ट मी. हे सगळे फोटो आणि माझा पूर्ण रीपोर्ट मी टाईप करून ऑफिसच्या मेल-बॉक्स मध्ये ठेवला आहे. माझ काही बर वाईट झाल तर तो रिपोर्ट कुणाकडे द्यायचा ह्याच्या सुचना ही मी देऊन ठेवलेल्या आहेत. सो टेक केअर… ” दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते कुठेतरी निघून गेला होता. स्टेफनी आणि दीपक रूम-मध्ये व्हिस्की घेऊन बसले होते. दोघांनाही काही सुचत नव्हते. “सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नहिए…”, दीपक म्हणाला, “मोहिते जे म्हणतो आहे तेच करावे. निदान ह्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडू