भारतरत्न : विनोबा भावे

  • 11.7k
  • 2
  • 2.9k

कोकण प्रदेशातील रायगड जिल्हा! रायगड जिल्ह्यातील गागोदे या नावाचे गाव. गागोदे गावात नरहरी भावे या नावाचे एक गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव रुक्मिणीबाई होते. नरहरी भावे हे बडोदा येथील संस्थानात नोकरीस होते. नरहरी-रुक्मिणीबाई यांना चार मुले होती. त्यापैकी एक मुलगा म्हणजे विनायक! विनायकचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ यादिवशी गागोदे येथे झाला. विनायकला बालकृष्ण, शिवाजी, दत्तात्रेय हे तीन भाऊ होते.